ब्लॅकबेरी कंपनीने आपला क्लासिक हा स्मार्टफोन सादर केला आहे. भारतात स्नॅपडील आणि ब्लॅकबेरी स्टोअर्सच्या माध्यमातून हा स्मार्टफोन उपलब्ध झाला आहे.
ऍपल व सॅमसंगच नव्हे तर शिओमीसारख्या चिनी कंपन्यांची स्मार्टफोन विक्रीत जोरदार आगेकुच होत असतांना ब्लॅकबेरी कंपनी मात्र अडचणीत आलेली आहे. काही दिवसांपासून ब्लॅकबेरी कंपनीला सॅमसंग खरेदी करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभुमीवर ब्लॅकबेरी क्लासिक हे नवीन मॉडेल सादर करण्यात आले आहे.
ब्लॅकबेरी क्लासिकमध्ये ३.५ इंच आकारमानाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात आठ आणि दोन मेगापिक्सल्सचे कॅमेरे आहेत. ब्लॅकबेरीच्या व्ही १०.३.१ या ऑपरेटींग प्रणालीवर चालणारा हा स्मार्टफोन १.५ गेगाहर्टझ क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने युक्त आहे. याची रॅम दोन जीबी असुन यात १६ जीबी इंटर्नल स्टोअरेज असून ते मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वार्टी किपॅड देण्यात आलेला आहे. भारतात स्नॅपडील आणि ब्लॅकबेरी स्टोअर्सच्या माध्यमातून ३१,९९९० रूपयांना हा स्मार्टफोन उपलब्ध झाला आहे.