आलाय लेनोव्हो के-४ नोट

0

लेनोव्हो कंपनीने भारतात किफायतशीर दरात उत्तमोत्तम फिचर्स असणारा के-४ नोट हा स्मार्टफोन लॉंच केला असून याची नोंदणी सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून लेनोव्हो कंपनी सातत्याने आपल्या आगामी के-४ नोट या स्मार्टफोनचे टिझर्स जाहीर करत असल्याने याबाबत उत्सुकता लागली होती. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लेनोव्हो कंपनीने ५ जानेवारी रोजी नवीन प्रॉडक्ट लॉंच करणार असल्याचे जाहीर केले होते. यानुसार आज लेनोव्हो के-४ नोट हे नवीन मॉडेल लॉंच करण्यात आले.

लेनोव्हो के-३ नोट हे आधीचे मॉडेलही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरले आहे. या पार्श्‍वभुमीवर नवीन मॉडेलमध्येही उत्तम फिचर्स आहेत. हा स्मार्टफोन ड्युअल सीम आणि फोर-जी नेटवर्क सपोर्ट असणारा आहे. यात ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले दिलेला असून यावर कॉर्निंग गोरिला ग्लास थ्रीचे संरक्षक आवरण आहे. याची रॅम तीन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते १४४ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यात १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतेचे दोन कॅमेरे दिलेले आहेत. अँड्रॉईडच्या लॉलिपॉप प्रणालीवर चालणार्‍या या मॉडेलवर व्हाईब युजर इंटरफेस दिलेला आहे.

लेनोव्हो के-४ नोट हा स्मार्टफोन ३३०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स दिलेले आहेत. हा स्मार्टफोन ११,९९९ रूपयांना फक्त अमेझॉन इंडिया या ई-पोर्टलवरून फ्लॅश सेलच्या स्वरूपात ग्राहकांना मिळणार आहे. यासाठी आजपासून नोंदणी सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here