आली नवीन सुझुकी अॅक्सेस १२५ !

0

सुझुकी कंपनीने भारतात आपली नवीन अॅक्सेस १२५ ही स्कूटर सादर करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

नवीन सुझुकी अॅक्सेस १२५ या स्कूटरमध्ये आधीच्या मॉडेलमध्ये काही प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने सुधारित समोरच्या बाजूसह हेडलाईट आणि टेललँपमध्ये प्रमुख बदल करण्यात आले आहेत. यात आधीप्रमाणेच १२४ सीसी क्षमतेचे सिंगल सिलींडर एयर कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. तर यात पुढील बाजूस टेलिस्कोपिक सस्पेन्शनची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. होंडा अॅक्टीव्हा १२५ आणि महिंद्राच्या आगामी गुस्तो १२५ या दोन मॉडेलला नवीन अॅक्सेस १२५ स्पर्धा करणार आहे. या मॉडेलचे दिल्लीतील एक्स-शोरूम मुल्य ५३,८८७ रूपये इतके असून लाल, निळा, राखाडी, काळा व पांढरा अशा पाच रंगांमध्ये ही स्कूटर ग्राहकांना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here