इंटेक्स कंपनीने आपल्या अॅक्वा मालिकेत अॅक्वा विंग आणि अॅक्वा रेझ हे दोन नवीन स्मार्टफोन अनुक्रमे ४५९९ आणि ५१९९ रूपयांना लॉंच केले आहेत.
हे दोन्ही स्मार्टफोन किफायतशीर दरात उत्तम फिचर्स असणारे आहेत. कंपनीने केलेल्या लिस्टींगनुसार अॅक्वा विंग या मॉडेलमध्ये चार इंच आकारमानाचा आणि डब्ल्यूव्हिजीए अर्थात ८०० बाय ४८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. याची रॅम एक जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असणार आहे. यात ५ आणि ०.३ मेगापिक्सल्स क्षमतेचे दोन कॅमेरे असतील. हा स्मार्टफोन अँड्रॉईडच्या ५.१ लॉलिपॉप आवृत्तीवर चालणारा आहे. याची बॅटरी १५०० मिलीअँपिअर क्षमतेची असणार आहे.
इंटेक्स अॅक्वा रेझ या मॉडेलमध्ये ४.५ इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए म्हणजेच ८५४ बाय ४८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असणार आहे. यातील दोन्ही कॅमेरे हे अनुक्रमे ५ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतेचे आहेत. तर हा स्मार्टफोन १८०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज असणार आहे. इंटेक्स कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन लिस्ट केले असले तरी ते ग्राहकांना नेमके केव्हा मिळणार? याची माहिती दिलेली नाही.