इंटेक्सच्या फोर-के स्मार्ट एलईडी टिव्हीची नवीन मालिका

0

इंटेक्स टेक्नॉलॉजी या कंपनीने भारतीय बाजारपेठेत फोर-के क्षमतेच्या स्मार्ट एलईडी टिव्हींची नवीन मालिका उतारण्याची घोषणा केली आहे.

ऐन सणासुदीच्या कालखंडात विविध कंपन्या आपापली नवीन उत्पादने लॉंच करत आहेत. यामध्ये आता इंटेक्स टेक्नॉलॉजी या कंपनीने तीन नवीन स्मार्ट एलईडी टिव्ही सादर केले आहेत. याला ४३, ५० आणि ५५ इंच आकारमानाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले असून यांचे मूल्य ५२,९९० रूपयांपासून सुरू होणारे आहेत. या तिन्ही मॉडेल्समध्ये एआरएम कोर्टेक्स ए९ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम १.५ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी इतके प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये वाय-फाय नेटवर्कचा सपोर्ट दिलेला आहे. तर यात मिराकास्ट हे फिचरदेखील दिलेले आहे. यामुळे कुणीही युजर आपल्या स्मार्टफोनवरील कंटेंटला टिव्हीवर पाहू शकतील.

इंटेक्सच्या या स्मार्ट एलईडी टिव्हींमध्ये फोर-के म्हणजेच ३८४० बाय २१६० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १६:९ असून १७८ अंशाचा व्ह्यूइंग अँगल दिलेला आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे आहे. यात युट्युब, फेसबुक, जिओ सिनेमा आदी अ‍ॅप्स प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आलेले आहेत. याच्या जोडीला इंटेक्सने आपले स्वत:चे अ‍ॅप स्टोअरदेखील यावर दिले आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यामध्ये तीन एचडीएमआय पोर्ट, दोन युएसबी पोर्ट दिलेले आहेत. यात १० वॅट क्षमतेचे दोन स्पीकर दिलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here