इंटेक्स क्लाऊड सी १, अ‍ॅक्वा एस १ दाखल

0

इंटेक्स कंपनीने क्लाऊड सी १ आणि अ‍ॅक्वा एस १ हे किफायतशीर दरातले आणि फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणारे दोन स्मार्टफोन बाजारपेठेत सादर केले आहेत.

इंटेक्स कंपनीचे हे दोन्ही स्मार्टफोन्स अनुक्रमे ३४९९ आणि ३९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येतील. दोन्हीमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असून दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असतील. यातील इंटेक्स क्लाऊड सी १ या मॉडेलमध्ये चार इंच आकारमानाचा आणि ४८० बाय ८०० म्हणजेच डब्ल्यूव्हिजीए क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात स्प्रेडट्रम कोर्टेक्स ए७एमपी हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम एक जीबी आणि स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. यातील दोन्ही कॅमेरे प्रत्येकी ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे आहेत. तर यातील बॅटरी १७५० मिलीअँपिअर क्षमतेची असेल.

तर इंटेक्स अ‍ॅक्वा एस १ या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि ४८० बाय ८५४ पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात मीडियाटेक कोर्टेक्स ए५३ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम एक जीबी आणि स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. यातील दोन्ही कॅमेरे प्रत्येकी ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे आहेत. तर यातील बॅटरी २३०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here