इंटेलतर्फे नवीन पिढीतल्या गतीमान प्रोसेसर्सची घोषणा

0
इंटेल गतीमान प्रोसेसर्स, intel-9th-generation-processors

इंटेल कंपनीने नवव्या पिढीतील अत्यंत गतीमान अशा प्रोसेसर्सची घोषणा केली असून लवकरच याचा विविध उपकरणांमध्ये वापर केला जाणार आहे.

प्रोसेसर हा कोणत्याही उपकरणाचा आत्मा असतो असे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही. यामुळे दिवसेंदिवस अत्याधुनीक होत जाणार्‍या डिव्हाईसेसमध्ये गतीमान प्रोसेसर्स अत्यावश्यक असतो. या अनुषंगाने या क्षेत्रातील मातब्बर नाव असणार्‍या इंटेल कंपनीने आता आपल्या नवव्या पिढीतील प्रोसेसर्सची घोषणा केली आहे. यात कोअर आय-५, आय-७ आणि आय-९ या प्रोसेसर्सचा समावेश आहे. यांना इंटेल कोअर आय५-९६००के; आय७-९७००के आणि आय९-९९००के या नावाने बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहे. यांचे मूल्य अनुक्रमे २७९.९९; ३९९.९९ आणि ५७९.९९ डॉलर्स आहे. अर्थात हे प्रोसेसर्स आधीच्या तुलनेत महाग आहेत. पर्यायाने यांचा समावेश असणारी उपकरणेदेखील अर्थातच महागडी असणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये यावर आधारित उपकरणे बाजारपेठेत सादर होतील असे संकेत मिळाले आहेत.

इंटेलने जाहीर केलेले हे प्रोसेसर्स ऑक्टा-कोअर या प्रकारातील असून यामध्ये १६ थ्रेडस् आणि ५.० गेगाहर्टझ इतका वेग असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. सर्वसाधारण ग्राहकांसाठी सादर करण्यात आलेले हे आजवरचे सर्वाधीक गतीमान प्रोसेसर्स आहेत. याचा उच्च ग्राफीक्सयुक्त कंटेंटच्या प्रोसेसिंगसाठी उपयोग होऊ शकतो. विशेष करून गेगिंममध्ये हे प्रोसेसर्स अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यातील कोअर आय९-९९००के हा इंटेल कंपनीचा आजवरचा सर्वात अद्ययावत असा प्रोसेसर असून तो महाग असला तरी जगभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here