इन्टाग्रामवर लवकरच ‘मल्टी फोटो शेअरिंग’

0
instagram_logo

इन्टाग्रामच्या युजर्सला लवकरच आपल्या पोस्टमध्ये एकापेक्षा जास्त प्रतिमांना शेअर करण्याची सुविधा मिळणार असून या फिचरची चाचणी सुरू आहे.

इन्टाग्रामवर सध्या फक्त काही जाहिरातदारांनाच फोटो अल्बमच्या स्वरूपातील जाहिराती प्रकाशित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तर काही अ‍ॅप्लीकेशनच्या मदतीने कुणीही युजर फोटोंचा कोलाज अपलोड करू शकतो. मात्र आता अल्बम अपडेट करण्याचे फिचर सर्व युजर्सलाही मिळण्याचे संकेत मिळाले असून अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीवरील काही युजर्सच्या माध्यमातून याची चाचणी सुरू असल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात ‘ड्रॉईड लाईफ’ या टेक पोर्टलने सविस्तर वृत्त प्रकाशित केले आहे. यानुसार इन्टाग्रामच्या आगामी अपडेटमध्ये सर्व युजर्सला ही सुविधा मिळणार आहे. या अंतर्गत कुणीही युजर आपल्या गॅलरीतील कमाल दहा फोटो निवडून त्याला विविध फिल्टर्सच्या मदतीने सुशोभित करून त्यांना अल्बमच्या स्वरूपात प्रसिध्द करू शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here