इन्फिबीमचा आयपीओ लवकरच !

0

इन्फिबीमने लवकरच आयपीओ सादर करण्याची घोषणा केली असून शेअर बाजारात नोंदणीकृत होणारी ही देशातील पहिली ई-कॉमर्स कंपनी बनणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून फ्लिपकार्ट व स्नॅपडील या कंपन्यांचे आयपीओ येणार असल्याची चर्चा होती. मात्र शेअर बाजारातून भाग भांडवल जमा करण्यात इन्फिबीमने बाजी मारली आहे. या कंपनीने आयपीओ लॉंच करण्याची घोषणा केली आहे. ३६० ते ४३२ रूपये प्रति समभाग या किंमतपट्ट्यात इन्फिबीम शेअर बाजारातून ४५० कोटी रूपयांचे भांडवल जमा करणार आहे. या भांडवलाच्या मदतीने इन्फिबीम कंपनी आपल्या नोंदणीकृत आणि कार्पोरेट कार्यालयाचे स्थलांतर करणार आहे. याशिवाय नवीन क्लाऊड डाटा सेंटर उघडणे तसेच देशात नवीन ७५ लॉजीस्टीक सेंटर्स उघडण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे.

२०१० साली विशाल मेहता या अमेझॉनच्या माजी कर्मचार्‍याने इन्फिबीमची स्थापना केली होती. आजवर या कंपनीने फक्त बेनेट अँड कोलमन कंपनीकडून ३३.३ कोटी रूपयांची ‘ऍड-फॉर इक्विटी’ अंतर्गत मदत घेतली होती. यामुळे ‘बेनेट अँड कोलमन’कडे १.८ टक्के मालकी आहे. हा अपवाद वगळता इन्फिबीमने कोणत्याही व्हेंचर कॅपिटलीस्टकडून भांडवल जमा केले नव्हते. या पार्श्‍वभुमिवर या कंपनीच्या आयपीओला कितपत प्रतिसाद लाभतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here