इन्स्टाग्रामचा बदलला लूक

0
instagram-changes-logo

फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप इन्स्टाग्रामने आपल्या लोगोसह संपुर्ण इंटरफेस बदलला असून ताज्या अपडेटमध्ये हे बदल दिसत आहेत.

फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्रामचे जभगरात ४० कोटींपेक्षा जास्त युजर्स असून यावर दररोज तब्बल आठ कोटी फोटो व व्हिडीओजची देवाण-घेवाण होते. काही दिवसांपासून या अ‍ॅपचा कायापालट होणार असल्याची चर्चा होती. यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. यातील सर्वात महत्वाचा बदल म्हणजे इन्स्टाग्रामचे बोधचिन्ह अर्थात लोगो बदलण्यात आला आहे. नवीन लोगोवर युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बर्‍याच जणांनी याचे स्वागत केले असले तरी अनेकांनी याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. या बदलात अधिक सुलभ डिझाईन असणारा आयकॉन देण्यात आला आहे. याशिवाय अ‍ॅपचा लेआऊट आणि रंगसंगतीदेखील बदलण्यात आली आहे. इन्स्टाग्रामच्या अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटींग प्रणालीसाठी हे बदल करण्यात आले आहेत. ताज्या अपडेटच्या माध्यमातून युजर्सला मिळणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here