इन्स्टाग्रामच्या अपडेटमध्ये आहे तरी काय ?

0
इन्स्टाग्राम,इन्स्टाग्रामच्या,instagram

इन्स्टाग्राम या फोटा शेअरिंग अ‍ॅपचे ताजे अपडेट नुकतेच सादर करण्यात आले असून यात काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

इन्स्टाग्रामच्या अपडेटमध्ये डायरेक्ट मॅसेजशी संबंधीत तीन महत्वाच्या सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. यात आता संदेशाच्या स्वरूपात प्रतिमा वा व्हिडीओ पाठवितांना तो क्रॉप करण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण ताज्या अपडेटमध्ये पोर्ट्रेट आणि लँडस्केप या दोन्ही प्रकारातल्या इमेज आणि व्हिडीओ अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आधी यासाठी चौकोनी आकारात क्रॉप करावे लागत होते. दुसरे महत्वाचे फिचर म्हणजे आता इन्स्टाग्रामवरून डायरेक्ट मॅसेज पाठवितांना लिंक आणि त्याचा प्रिव्ह्यू पाहण्याची सुविधाही प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय कुणीही आता दूरध्वनी क्रमांक अथवा पत्त्यांनी युक्त असणार्‍या लिंकही डायरेक्ट मॅसेजच्या माध्यमातून शेअर करू शकणार आहेत. इन्स्टाग्रामच्या जगभरातील अँड्रॉइड व आयओएस युजर्सला क्रमाक्रमाने हे अपडेट देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here