इन्स्टाग्रामच्या बुमरँग व्हिडीओसाठी नवीन फिचर्स

0
इन्स्टाग्राम,इन्स्टाग्रामच्या,instagram

इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी बुमरँग विभागातील व्हिडीओ अतिशय आकर्षक पध्दतीत संपादीत करण्यासाठी तीन नवीन फिचर्स दिलेले आहेत.

इन्स्टाग्राम या फोटो व व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅपची जगभरात लोकप्रियता आहे. या अनुषंगाने इन्स्टाग्रामवर युजर्सला नवनवीन फिचर्स मिळत आहेत. यात आता तीन नवीन फिचर्सची भर पडली आहे. हे फिचर्स बुमरँग या फिल्टरसाठी प्रदान करण्यात आले आहेत. याच्या अंतर्गत स्लोमो, इको आणि ड्युओ हे एडिटींग टुल्स देण्यात आलेले आहेत. यातील स्लोमो या टुलच्या मदतीने नॉर्मल स्पीडपेक्षा निम्म्याने व्हिडीओची गती कमी करता येणार आहे. यामुळे अर्थातच स्लो-मोशनचा इफेक्ट मिळणार आहे. इको या टुलच्या मदतीने डबल व्हिजन या प्रकारचा इफेक्ट मिळवता येणार आहे. तर ड्युओच्या मदतीने व्हिडीओची गती वाढविणे व कमी करण्यासह याला टेक्सचर प्रदान करता येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आता बूमरँगवर आधी रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडीओजची लांबी कमीदेखील करता येणार आहे. हे तिन्ही फिचर्स इन्स्टाग्रामच्या स्टोरीज कॅमेरा या भागात उपलब्ध आहेत. याचा वापर करण्यासाठी स्टोरी कॅमेरा ओपन करून बुमरँगवर जावे लागेल. यानंतर येथे इन्फीनिटी या चिन्हावर टॅप केल्यानंतर हे टुल्स वापरता येणार आहेत.

इन्स्टाग्रामचे हे तिन्ही नवीन फिचर्स जगभरातील युजर्सला क्रमाक्रमाने अपडेटच्या स्वरूपात सादर करण्यात येणार आहेत. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी याला उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here