इन्स्टाग्रामवर क्रियेटिव्ह टुल्स

0

इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी आगामी क्रिसमस व नववर्षाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी क्रियेटिव्ह टुल्स सादर करण्याची घोषणा केली आहे.

इन्स्टाग्रामच्या क्रियेटिव्ह टुल्समध्ये या अ‍ॅपवर आधीपासूनच देण्यात आलेल्या सुपरझूम इफेक्टस, फेस फिल्टर्स आणि हॉलिडे स्टीकर्समध्ये काही नवीन बाबींची भर टाकण्यात आली आहे. यातील सुपरझूम फिचरमध्ये आता साऊंट इफेक्टची सुविधादेखील देण्यात आली आहे. यासाठी सुपरझूम करतांना म्युझिक आयकॉनवर क्लिक केल्यावर युजरला बाऊस, बीटस आणि टिव्ही शो या तीन विविध प्रकारांपैकी आपल्याला हवा तो साऊंड इफेक्ट देता येणार आहे. हे फिचर येत्या काही दिवसांमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे.

इन्स्टाग्रामच्या क्रियेटिव्ह टुल्समध्ये फेस फिल्टर्समध्ये नवीन इफेक्ट देण्यात आले आहेत. यात आता विविध आकर्षक बलून्स आणि स्नो इफेक्ट देत आपल्या प्रतिमांना शेअर करता येणार आहे. आगामी सुटीचा कालखंडा लक्षात घेता यात सेलिब्रेशनशी संबंधीत फिल्टर्स देण्यात आल्याचे दिसून येत आहे. तर स्टीकर्समध्ये आगामी क्रिसमस, ज्यू धर्मियाच्या हनूक तर आफ्रो-अमेरिकन्सच्या ख्वांझा या सणांसाठी नवीन स्टीकर्सची भर टाकण्यात आली आहे. यासोबत यात नववर्षाच्या स्वागतासाठीही खास स्टीकर्स देण्यात आले आहेत. तर क्रियेटिव्ह टुल्समध्ये आयफोनच्या युजर्सला काही नवीन कलर फिल्टर्सचा वापरदेखील करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here