इन्स्टाग्रामवर प्रतिमा व व्हिडीओच्या स्वरूपातील प्रतिक्रियेची सुविधा

0
instagram_logo

इन्स्टाग्रामने आता कोणत्याही युजरच्या ‘स्टोरीज’वर इमेज अथवा व्हिडीओच्या स्वरूपात प्रतिक्रिया देण्याची सुविधा दिली असून हे फिचर अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी असेल.

इन्स्टाग्रामवर ‘स्टोरीज’ मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. यात कुणीही कॉमेंट करू शकतो. आता यात इमेज आणि व्हिडीओदेखील टाकता येणार आहेत. यासाठी स्टोरीजच्या खाली कॅमेर्‍याचा आयकॉन देण्यात आला आहे. यावर क्लिक करून कुणीही स्टीकर्स, फेस फिल्टर्स आदींसह व्हिडीओ तयार करून टाकू शकतो. हे अपडेट अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालीच्या युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. यासाठी अनुक्रमे गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर इन्स्टाग्रामचे ताजे अपडेट सादर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here