इन्स्टाग्रामवर फेव्हरिट फिचर

0
इन्स्टाग्राम,इन्स्टाग्रामच्या,instagram

इन्स्टाग्राम या सोशल शेअरिंग अ‍ॅपने आता फेव्हरिट या नावाने नवीन फिचर देण्याचे संकेत दिले असून काही युजर्सला ही सुविधा देण्यात आली आहे.

इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अ‍ॅपच्या काही युजर्सला आता फेव्हरिट हे फिचर दिसू लागले आहे. याच्या अंतर्गत कुणीही आपल्याला हव्या असणार्‍या अन्य युजर्सचा ग्रुप तयार करू शकेल. यानंतर तो आपल्याला हवी ती पोस्ट फक्त या फेव्हरिट ग्रुपसाठी शेअर करू शकेल. म्हणजेच त्याने अशा पध्दतीने शेअर केलेली पोस्ट ही फक्त फेव्हरिट गु्रपधील सदस्यांनाच दिसू शकेल. अर्थात कोणतीही पोस्ट वा फोटा शेअर करण्याआधी तो सर्वांसाठी (पब्लीक) शेअर करायचाच की फेव्हरिट ग्रुपसाठी ? याची विचारणा करण्याची सुविधा यात असेल. यापैकी हवा तो पर्याय निवडून त्या-त्या प्रकारे शेअर करता येईल. यापैकी एखादी पोस्ट फेव्हरिट ग्रुपसाठी शेअर केलेली असल्यास त्याचा शिक्का यावर असेल. तसेच यासाठी प्रोफाईलवर स्वतंत्र विभागदेखील प्रदान करण्यात येणार आहे. सध्या निवडक युजर्सला फेव्हरिट फिचर दिसत असून येत्या काही महिन्यांत सर्वांना क्रमाक्रमाने याला अपडेटच्या स्वरूपात प्रदान करण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here