इन्स्टाग्रामवर येणार पोर्ट्रेट मोड

0
इन्स्टाग्राम,इन्स्टाग्रामच्या,instagram

इन्स्टाग्राम अ‍ॅपच्या युजर्सला लवकरच पोर्ट्रेट मोडमधील छायाचित्रे शेअर करण्याची सुविधा प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

इन्स्टाग्राम हे अ‍ॅप जगभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. याच्या माध्यमातून शेअर करण्यात आलेल्या प्रतिमांसाठी विविध फिचर्स दिले आहेत. सद्यस्थितीत या अ‍ॅपच्या कॅमेर्‍यात सुपरझूम आणि बुमरँग हे फिचर्स दिलेले आहेत. यात लवकरच पोर्ट्रेट मोडची भर पडणार असल्याचे वृत्त टेकक्रंच या टेक पोर्टलने दिले आहे. याच्या अंतर्गत लवकरच इन्स्टाग्रामचे युजर्स पोर्ट्रेट या प्रकारातील छायाचित्रे काढून ती शेअर करू शकणार आहे. विशेष म्हणजे यात बोके इफेक्टची सुविधासुध्दा असेल. परिणामी पोर्ट्रेट प्रकारातील प्रतिमा काढून यातील पार्श्‍वभागाला धुसर (ब्लर) करता येणार आहे. याशिवाय यात अन्य फिल्टर्सची सुविधादेखील देण्यात येणार आहे. याबाबत इन्स्टाग्रामतर्फे अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नसले तरी काही युजर्सच्या माध्यमातून पोर्ट्रेट मोडची चाचणी सुरू असून हे फिचर लवकरच युजर्सला मिळणार असल्याचे टेकक्रंचच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here