उबर या अॅपवर आधारित कॅब अॅग्रीगेटरने भारतात आपली ऑटो रिक्षांची सेवा पुन्हा नव्याने सुरू करण्याची घोषणा केली आहे.
उबरने मार्च २०१६ मध्ये ऑटो सेवा बंद केली होती. आता मात्र ही सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. उबरला ओला या भारतीय कंपनीकडून मोठ्या प्रमाणात टक्कर मिळाली आहे. ७३ शहरांमध्ये अस्तित्व असणार्या ओलाने उबरला तगडे आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे ओलावर आधीपासून ऑटो रिक्षा बुक करण्याची सुविधा आहे. या पार्श्वभूमिवर, उबरनेही पुन्हा ऑटो सेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. पुणे आणि बंगळुरू शहरांपासून ही सेवा पहिल्यांदा सुरू होणार आहे. यात कुणीही ग्राहक ऑटो या पर्यायावर क्लिक करून आपल्या प्रवासासाठी रिक्षा बुक करू शकेल. या दोन शहरानंतर उबर कंपनी अन्य शहरांमध्ये याचा विस्तार करण्याची शक्यता आहे. अर्थात या माध्यमातून उबर आणि ओला या कंपन्यांमध्ये चुरशीची स्पर्धा सुरू होणार आहे.