एचटीसी डिझायर ८२८ ड्युअल सीमची लिस्टींग

0

एचटीसी कंपनीने आपल्या डिझायर ८२८ ड्युअल सीम या स्मार्टफोनला भारतात लॉंच करण्याचे ठरविले असून याची ई-कॉमर्स वेबसाईटवर लिस्टींग करण्यात आली आहे.

काही दिवसांपुर्वीच चीनमध्ये एचटीसी डिझायर ८२८ हा स्मार्टफोन लॉंच करण्यात आला होता. आता एचटीसी डिझायर ८२८ ड्युअल सीम या नावाने हे मॉडेल भारतात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी अर्थात १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हे मॉडेल १.५ गेगाहर्टझ मीडियाटेक एमटी६७५३ प्रोसेसरने सज्ज आहे. याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी इतके असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने तब्बल दोन टिबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यात १३ आणि ४ मेगापिक्सल्स क्षमतेचे दोन कॅमेरे दिलेले आहेत.

एचटीसी डिझायर ८२८ ड्युअल सीम या स्मार्टफोनमध्ये फोर-जी आणि थ्री-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटीसह वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स दिलेले आहेत. अँड्रॉईडच्या लॉलिपॉप या आवृत्तीवर चालणारा हा स्मार्टफोन २,८०० मिलीअँपीअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज आहे. हे मॉडेल भारतात येणार असल्याचे स्पष्ट असले तरी याचे मुल्य मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here