एलजीचा स्टायलस पेनयुक्त स्मार्टफोन दाखल

0
एलजी क्यू स्टायलस प्लस, lg q stylus plus

एलजी कंपनीने स्टायलस पेनच्या सपोर्टने युक्त असणारा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

टॅबलेटप्रमाणे मोजक्या स्मार्टफोनमध्ये स्टायलस पेनचा सपोर्ट दिलेला आहे. या पेनच्या मदतीने कुणीही डिस्प्लेवर नोटस् घेणे, रेखाटन करणे आदी कामे पार पाडू शकतात. या अनुषंगाने एलजीने आता भारतीय ग्राहकांसाठी एलजी क्यू स्टायलस प्लस हा स्मार्टफोन सादर केला आहे. यातील स्टायलस पेनमध्ये पाम रिजेक्शन हे खास फिचर देण्यात आले आहे. याच्या मदतीने अगदी अचूक रेखाटन करता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. विशेष बाब म्हणजे डिस्प्ले ऑफ असतांनाही यावर केलेले रेखाटन आपोआप सेव्ह होण्याची सुविधादेखील यात देण्यात आली आहे. तसेच स्मार्टफोनमधून घेतलेल्या प्रतिमा अथवा व्हिडीओजला या पेनच्याच मदतीने अ‍ॅनिमेशनमध्ये परिवर्तीत करता येणार आहे. अर्थात स्टायलस पेनचा सपोर्ट हा या मॉडेलसाठी सेलींग पॉइंट ठरणार असल्याची बाब स्पष्ट आहे. या स्मार्टफोनचे मूल्य २१,९९० रूपये असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये सादर करण्यात आले आहे.

दरम्यान, एलजी क्यू स्टायलस प्लस या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचा व फुल एचडी प्लस (२१६० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १८:९ असा आहे. यात ऑक्टा-कोअर प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी दिलेले असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात डीटीएस : एक्स प्रणालीने सज्ज असणारी ऑडिओ सिस्टीम दिलेली आहे. याच्या मागील बाजूस १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला असून यात ऑटो-फोकस, फेज डिटेक्शन व एलईडी फ्लॅशची सुविधा देण्यात आली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे. यात ३,३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या आवृत्तीवर चालणारे आहे. लक्षणीय बाब म्हणजे हा स्मार्टफोन एमआयएल-एसटीडी-८१०-जी या मानकानुसार उत्पादीत करण्यात आला आहे. यामुळे याला अतिशव विषम वातावरणातही सहजपणे वापरता येणार आहे. तसेच हे मॉडेल वॉटरप्रूफ व डस्टप्रूफदेखील आहे.

यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here