एलजीचे नवीन फिंगरप्रिंट सेन्सर

0
lg_innotek_fingerprint_sensor_under_glass

एलजी कंपनीने स्मार्टफोनच्या डिस्प्लेखाली फिंगरप्रिंट सेन्सर लावले असून याच्या मदतीने स्वतंत्र बटनाविना हे फिचर वापरता येणार आहे.

सध्या बहुतांश फ्लॅगशीपच नव्हे तर मध्यम किंमतपट्टयातील स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा दिलेली असते. याच्या मदतीने स्मार्टफोन अगदी सुरक्षितपणे लॉक-अनलॉक करता येत असल्याने सुरक्षिततेसाठी हे फिचर अत्यंत परिणामकारक असल्याचे मानले जाते. सध्या तरी स्मार्टफोनवर ‘होम बटन’, त्याच्या बाजूला अथवा मागील बाजूस बोट ठेवून हे फिचर वापरता येते. आता मात्र एलजी कंपनीने स्मार्टफोनच्या डिस्प्लेखालीच फिंगरप्रिंट सेन्सर ठेवण्याची प्रणाली विकसित केली आहे. यामुळे कोणतेही स्वतंत्र बटन न वापरता स्मार्टफोनवर कुठेही बोट ठेवून त्याला लक अथवा अनलॉक करणे शक्य होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here