एलजी कँडी : अल्प मूल्यात उत्तमोत्तम फिचर्स

0
एलजी कँडी, lg candy

एलजी कंपनीने कँडी हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध केला असून यात अल्प मूल्यात उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

एलजी कँडी मॉडेलचे मूल्य ६,६९९ रूपये असून याला ब्ल्यू, ब्लॅक, सिल्व्हर आणि गोल्ड या या चार रंगाच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. एलजी कँडी या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी अर्थात १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आला असला तरी त्याचे नेमके नाव जाहीर केलेले नाही. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यातील फ्रंट कॅमेर्‍यामध्ये ऑटो-शॉट, जेस्चर शॉट, क्विक शेअर आदी फिचर्स देण्यात आले आहेत. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या आवृत्तीवर चालणारे आहे.

यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. एलजीसारख्या कंपनीने भारतीय बाजारपेठेतील कल लक्षात घेता कँडी हा किफायतशीर मूल्य असणारा स्मार्टफोन सादर केल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here