एसरने आपल्या प्रिडेटर या मालिकेत हेलिऑस ५०० हा लॅपटॉप भारतीय बाजारपेठेत उतारला असून यात उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.
एसरने हेलिऑस ५०० या मॉडेलला दोन व्हेरियंटमध्ये सादर केले आहे. यातील एका व्हेरियंटमध्ये इंटेलचा कोअर आय९+ आणि कोअर आय ७ या दोन्ही प्रोसेसरचा पर्याय आहे. यासोबत एनव्हिडीयाच्या जीटीएक्स १०७० या ग्राफीक्स प्रोसेसर दिलेला आहे. तर याला एएमडी रायझेन ७ या प्रोसेसरसोबतही सादर करण्यात आलेले आहे. यात एएमडी ५६ हा ग्राफीक प्रोसेसर असणार आहे. एसरने आपल्या या मॉडेलमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कुलींग सिस्टीम (शीतकरण प्रणाली) देण्यात आली आहे. यात एअरो-ब्लेड थ्री-डी मेटल फॅन्स आणि पाच हिट पाईप्सचा समावेश आहे. यामुळे यात सातत्याने खेळती हवा राहणार आहे. अर्थात, याचा दीर्घ वेळेपर्यंत वापर केला तरी हा लॅपटॉप तापणार नाही. या लॅपटॉपमध्ये १७.३ इंच आकारमानाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याला फुल एचडी आणि फोर-के या दोन्ही क्षमतांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. युजर त्याच्या गरजेनुसार याला विविध व्हेरियंटच्या स्वरूपात खरेदी करू शकतो. याला एचडीएमआय आणि थंडरबोल्टची कनेक्टीव्हिटी देण्यात आलेली आहे. याच्या माध्यमातून हा लॅपटॉप तीन अन्य डिस्प्लेंना कनेक्ट करता येणार आहे. कोणत्याही गेमींग लॅपटॉपमध्ये दर्जेदार ध्वनी प्रणाली आवश्यक असते. या अनुषंगाने यामध्ये दोन स्पीकर आणि एक सब-वुफरसह एसर ट्रु-हार्मनी आणि वेव्हेज मॅक्स ऑडिओ सिस्टीम देण्यात आली आहे. यामुळे यात अगदी जीवंत वाटणार्या थ्री-डी सराऊंड साऊंडची अनुभूती घेता येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
हेलिऑस ५०० या गेमींग लॅपटॉपच्या कोअर आय-७ प्रोसेसरवर चालणार्या लॅपटॉपचे मूल्य १,९९,९९० तर कोअर आय-९ वर चालणार्या मॉडेल्सचे मूल्य २,४९,९९० रूपयांपासून सुरू होणारे आहे.