ऑनर १० ला तडाखेबंद प्रतिसाद; ३० लाख हँडसेटची विक्री

0
ऑनर १०, honor 10

ऑनर १० या मॉडेलला तडाखेबंद प्रतिसाद लाभला असून लाँच झाल्यापासून काही महिन्यांमध्येच या मॉडेलचे तब्बल ३० लाख हँडसेट विकले गेले आहेत.

हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने चीनमध्ये मार्च महिन्यात ऑनर १० हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन लाँच केला होता. हे मॉडेल नंतर पुढील महिन्यातच भारतीय ग्राहकांसाठी ३२,९९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आले होते. याला भारतातही तडाखेबंद प्रतिसाद लाभला होता. आता या मॉडेलचे ३० लाख युनिट विकले गेले असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. ऑनर कंपनीने एका ट्विटच्या माध्यमातून याला जगासमोर मांडले आहे. यात कोणत्या देशात किती युनिट विकले गेलेत याबाबत भाष्य करण्यात आलेले नाही तथापि, हा टप्पा अतिशय महत्वाचा मानला जात आहे.

ऑनर १० या स्मार्टफोनमध्ये या स्मार्टफोनमध्ये ५.८४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २२८० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा फुल व्ह्यू या प्रकारातील आणि १९:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले आहे. या मॉडेलचे बॉडी-टू-स्क्रीन हे गुणोत्तर ८६.२ टक्के आहे. यामध्ये ऑक्टा-कोअर हायसिलीकॉन किरीन ९७० हा प्रोसेसर दिलेला आहे. हे मॉडेल ६ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. भारतात मात्र ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज हेच व्हेरियंट सादर करण्यात आले आहे.

ऑनर १० मॉडेलच्या मागील बाजूस २४ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा आहे. यात कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करून अगदी रिअल टाईम या प्रकारात दृश्य आणि व्यक्तींना ओळखण्याची प्रणाली दिलेली आहे. यात थ्री-डी प्रोर्ट्रेट लायटींग आणि एचडीआर आदी फिचर्सचाही समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात २४ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असून यातही कृत्रीम बुध्दीमत्ता आणि थ्री-डी पोर्ट्रेट लायटींग हे फिचर्स दिलेले आहेत. यात ७.१ मल्टी चॅनल हाय-फाय ऑडिओ चीप देण्यात आलेली असून यामुळे अतिशय सुश्राव्य अशा ध्वनीची अनुभूती घेता येते. यामध्ये ३,४०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड ओरियो ८.१ या प्रणालीपासून विकसित करण्यात आलेल्या एमआयुआय ८.१ या सिस्टीमवर चालणारा आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.