ऑनर ८ प्रो स्मार्टफोनची घोषणा

0

हुवे कंपनीने भारतात अनेक उत्तमोत्तम फिचर्सनी सज्ज असलेला ऑनर ८ प्रो हा स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली आहे.

वन प्लस या कंपनीने अलीकडेच आपले वन प्लस ५ हे फ्लॅगशीप मॉडेल सहा व आठ जीबी रॅमच्या दोन व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. या पाठोपाठ हुवे या दुसर्‍या चिनी कंपनीनेही सहा जीबी रॅम असणारा ऑनर ८ प्रो हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. या वर्षाच्या प्रारंभी हे मॉडेल ऑनर व्ही ९ या नावाने लाँच करण्यात आले होते. भारतात मात्र हा स्मार्टफोन ऑनर ८ प्रो या नावाने विकला जाणार आहे. नेव्ही ब्ल्यू आणि मिडनाईट ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायामध्ये उपलब्ध करण्यात आलेला हा स्मार्टफोन येत्या काही दिवसात भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. तथापि याचे मूल्य अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

या मॉडेलमध्ये ५.७ इंच आकारमानाचा आणि १४४० बाय २५६० पिक्सल्स म्हणजेच क्युएचडी क्षमतेचा एलटीपीएस एलसीडी डिस्प्ले असेल. वर नमूद केल्यानुसार याची रॅम सहा जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविता येईल. याच्या मागच्या बाजूस प्रत्येकी १२ मेगापिक्सल्स क्षमता असणारे दोन कॅमेरे देण्यात आले असून याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण शक्य आहे. तर सेल्फी व व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. ऑनर ८ प्रो हा स्मार्टफोन ४,००० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा इएमयुआय ५.१ हा युजर इंटरफेस असेल. तर कनेक्टिव्हिटीसाठी यात फोर-जी व्हिओएलटीईसह अन्य सर्व प्रचलीत पर्याय प्रदान करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here