ओला सुरू करणार बस सेवा

0

भारतातील आघाडीचे टॅक्सी ऍग्रीगेटर म्हणून ख्यात असणार्‍या ओला कंपनीने आता बंगळुरू आणि गुरगावमध्ये याच स्वरूपाची बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Ola-Bus

ऍपच्या माध्यमातून भारतात होणार्‍या ७५ टक्के व्यवसायाचा वाटा ओला कंपनीकडे आहे. आपल्या ग्राहकांना ही कंपनी नित्यनेमाने नवनवीन सेवा प्रदान करत असते. काही दिवसांपुर्वीच ओला कंपनीने आपल्या ग्राहकांना मोफत वाय-फाय सेवा प्रदान करण्याची घोषणा केली होती. यातच आता त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करत बस सेवेत पदार्पण करण्याचे ठरविले आहे.

या अनुषंगाने आता ओला बंगळुरू आणि गुरगाव या दोन शहरांमध्ये बस सेवा सुरू करत आहे. या अंतर्गत या दोन्ही शहरांमधील जवळपास प्रत्येक महत्वाच्या मार्गावर ओला बस धावणार आहेत. यातील दर हे एक डॉलरच्या आत अर्थात ५०-६० रूपयांच्या दरम्यान असतील असे ओला कंपनीने जाहीर केले आहे. या सर्व बस वातानुकुलीत असतील. यात मोफत वाय-फाय तसेच अत्याधुनिक जीपीएस नेव्हिगेशन प्रणाली असेल. २१ सप्टेंबरपासून या दोन शहरांमध्ये ही सेवा सुरू होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here