कावासाकी निंजा १००० दुचाकीची नवीन आवृत्ती

0

कावासाकी कंपनीने आपल्या निंजा १००० या दुचाकीनी नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

कावासाकी निंजा १००० (२०१८) या मॉडेलचे एक्स-शोरूम मूल्य ९.९ लाख रूपये आहे. ही स्पोर्टस् बाईक कंपनीच्या देशभरातील शोरूम्समधून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. यातील बहुतांश फिचर्स हे मूळ मॉडेलनुसारच असले तरी यामध्ये काही नवीन सुविधांना समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये आधीप्रमाणेच १०४३ सीसी क्षमतेचे फोर-सिलेंडर या प्रकारातील लिक्वीड कुल्ड सुविधेने युक्त इनलाईन इंजिन प्रदान करण्यात आले आहे. याला स्लीपर क्लचने युक्त असणार्‍या ६ स्पीड-गिअर्सशी संलग्न करण्यात आले आहे. याच्या दोन्ही चाकांमध्ये डिस्कब्रेकची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये कावासाकी कंपनीने विकसित केलेल्या इंटिलेजीयन्स एबएस प्रणालीची जोड दिलेली आहे. कावासाकी निंजा १००० (२०१८) या मॉडेलमध्ये अतिशय आकर्षक अशा ड्युअल हेडलाईटला प्रदान करण्यात आले आहे. तर यातील टेललँप्सही मूळ मॉडेलपेक्षा थोडे वेगळे आहेत. याशिवाय यात कावासाकी कॉर्नरींग मॅनेजमेंट फंक्शन आणि केटीआरसी हे नवीन फिचर्सदेखील दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here