कावासाकी व्हॅलकॅन एस आता नवीन आकर्षक स्वरूपात

0

कावासाकी कंपनीने आपली व्हलकॅन एस ही उच्च श्रेणीतील बाईक पर्ल लाव्हा ऑरेंज या अतिशय आकर्षक अशा रंगाच्या पर्यायात ग्राहकांना सादर केली आहे.

कावासाकी व्हॅलकॅन एस या दुचाकीच्या नवीन रंगातील आवृत्तीचे मूल्य ५,५८,४०० रूपये (दिल्लीतील एक्स-शोरूम मूल्य) असून ते मूळ आवृत्तीपेक्षा १० हजार रूपयांनी जास्त आहे. या ड्युअल टोन प्रकारातील रंगसंगतीमुळे कावासाकी व्हॅलकॅन एस बाईकला स्पोर्टी लूक मिळाला असून याची कंपनीच्या देशभरातील शो-रूम्समधून अगावू नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आधीच या क्रूझर बाईकला भारतीय बाजारपेठेत अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला आहे. यातच आता आकर्षक रंगाच्या पर्यायामुळे याला वाढीव पसंती मिळण्याची शक्यता आहे.

कावासाकी व्हॅलकॅन एस या मॉडेलच्या नवीन आवृत्तीमध्ये आधीप्रमाणेच ६४९ सीसी क्षमतेचे लिक्वीड-कुल्ड पॅरलल ट्विन या प्रकारातील इंजिन देण्यात आले असून याला ६-स्पीड गिअर्सशी संलग्न करण्यात आले आहे. याच्या दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक दिलेले आहेत. तथापि, यात एबीएस प्रणाली दिलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here