गुगल आर्ट अँड कल्चर अ‍ॅपचे अपडेट सादर

0

गुगलने आपल्या आर्ट अँड कल्चर अ‍ॅपचे अपडेट सादर केले असून आता कुणीही हे अ‍ॅप वापरून आपल्या सेल्फीला एखाद्या कलाकृतीत परिवर्तीत करू शकतो.

गुगल आर्ट अँड कल्चर अ‍ॅप यात कुणीही युजर सेल्फी काढून अपलोड करू शकतो. यानंतर या सेल्फीतील चेहरा गुगल आर्ट अँड कल्चर अ‍ॅपवर असणार्‍या जगभरातील विविध कलाकृतींपैकी नेमका कोणत्या कलाकृतीशी जुळतो? याचे पर्याय त्या युजरला देण्यात येतात. यातील योग्य पर्याय तो युजर निवडू शकतो. यात संबंधीत चेहरा नेमका किती टक्के मॅच होतो? याची माहितीदेखील देण्यात येते. ही तुलना करणारी प्रतिमा सोशल मीडियासह विविध माध्यमांमधून शेअर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. गुगल आर्ट अँड कल्चर अ‍ॅप यासाठी पॅटर्न रिकग्निशन आणि कृत्रीम बुध्दीमत्ता या प्रणालीचा वापर करत असते. ही सुविधा तशी अद्याप प्रायोगिक अवस्थेत असून लवकरच यात अजून अचूकता प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती रिकोड या टेक पोर्टलने दिली आहे. दरम्यान, हे अद्ययावत अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलचे अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. अर्थात अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींचे युजर्स याचा वापर करू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here