जाणून घ्या नवीन फॉर्च्युनरचे फिचर्स

0

टोयोटाने आपल्या फॉर्च्युनर या लोकप्रिय एसयुव्हीचे नवीन अद्ययावत मॉडेल भारतात सादर केले असून ते पेट्रोल आणि डिझेल या दोन इंजनच्या पर्यायात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

टोयोटा किलोस्कर मोटर्सच्या (टीकेएम) फॉर्च्युनरचे नवीन मॉडेलच्या सहा व्हेरियंटस्चे दिल्लीतील एक्स-शोरूम मुल्य २५.९२ ते ३१.१२ लाखांच्या दरम्यान आहे. यातील पेट्रोल व्हेरियंटमध्ये २.७ तर डिझेलमध्ये २.८ लीटर क्षमतेचे इंजिन प्रदान करण्यात आले आहे. गेल्या मे महिन्यात टोयोटाने इनोव्हा क्रिस्टा हे मॉडेल सादर केले होते. यानंतर आता दुसर्‍या पिढीतल्या फॉर्च्युनरला सादर करण्यात आले आहे. हे मॉडेल कंपनीच्या ‘टोयोटा न्यू जनरेशन आर्कीटेक्चर’ म्हणजेच ‘टिएनजीए’ या फ्रेमवर्कनुसार तयार करण्यात आले आहे. यामुळे ही नवीन कार वजनाने हलकी आणि अर्थात चालविण्यास अधिक उत्तम झाली आहे.

जुन्या मॉडेलपेक्षा यात अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात नवीन बंपर, एलईडी प्रोजेक्ट लँप, एलईडी ‘डे टाईम लँप’ व एलईडी टेल लँप प्रदान करण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी यात सात एयर बॅग्ज आणि ‘इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन’सह ‘अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम’ देण्यात आली आहे. याशिवाय यात व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट कंट्रोल व डाऊनहिल असिस्ट कंट्रोलची सुविधाही असेल. याच्या अंतर्भागातही अनेक बदल करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक मोकळी जागा असेल. या मॉडेलच्या डॅशबोर्डवर टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. याच्या मदतीने वातानुकुलन प्रणालीच्या नियंत्रणासह विविध फंक्शन्स देण्यात आले आहेत. विविध व्हेरियंटनुसार यात सहा मॅन्युअल आणि ऍटोमॅटीक स्पीर्ड गिअर्स प्रदान करण्यात आले आहेत. नवीन फॉर्च्युनर बाजारपेठेत मित्सुबिशीची पजेरो स्पोर्ट, फोर्डची एंडेव्हर, शेव्हरलेची ट्रेल ब्लेझर, हुंदाईची सांता फे या विविध मॉडेल्सला तगडे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here