जिओनी एफ १०३ @ ९,९९९

0

जिओनी या चिनी कंपनीने फोर-जी कनेक्टिव्हिटी असणारा एफ १०३ हा स्मार्टफोन ९,९९९ रूपयांना भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

Gionee-F103

ड्युअल सीम जिओनी एफ १०३ या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि १२८०*७२० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १.३ गेगाहर्टझ क्षमतेचा क्वॉड-कोअर प्रोसेसर दोन जीबी रॅमसोबत देण्यात आला आहे. यात १६ जीबी स्टोअरेज क्षमता असून ती मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. जिओनी एफ १०३ या मॉडेलमध्ये एलईडी फ्लॅशसह आठ मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य तर सेल्फीसाठी पाच मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. याची बॅटरी २४०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. कनेक्टिव्हिटींचा विचार करता यात फोर-जीसह थ्री-जी, ब्ल्यू-टुथ, वाय-फाय आणि जीपीएसचे पर्याय देण्यात आले आहेत.

अँड्रॉईड लॉलिपॉपवर चालणार्‍या जिओनी एफ १०३ या मॉडेलमध्ये अत्यंत स्टायलीश मेटालिक फ्रेम देण्यात आलेली आहे. या स्मार्टफोनचे मुल्य ९,९९९ रूपये असून येत्या आठवड्यात तो ग्राहकांना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here