जिओनी कंपनीने आपल्या मॅरेथॉन एम फाईव्ह या स्मार्टफोनचे लाईट व्हर्शन भारतात सादर करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
अनेक कंपन्या आपल्या विख्यात मॉडेलचे ‘मिनी’ व्हर्शन आणत असतात. यात मुळ मॉडेलमधील काही फिचर्स कायम ठेवून थोडा बदल करण्यात आलेला असतो. या अनुषंगाने आता जिओनी कंपनीनेही आपल्या मॅरेथॉन एम फाईव्ह या मॉडेलचे नवीन व्हेरियंट सादर केले आहे. याला मॅरेथॉन एम फाईव्ह लाईट असे नाव देण्यात आले आहे.
जिओनी एम फाईव्ह लाईट या व्हर्शनमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याची रॅम एक जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी इतके देण्यात आले आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. जिओनी कंपनीचा हा स्मार्टफोन ८ आणि ५ मेगापिक्सल्च्या कॅमेर्यांनी सज्ज असून यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ड्युअल सीम या प्रकारातील या स्मार्टफोनमध्ये ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, जीपीएस/ए-जीपीएस आदी फिचर्स देण्यात आले आहेत.