जिओफोन नोंदणीस अभूतपुर्व प्रतिसाद; सर्व फिचर्स जाहीर

0

रिलायन्सने आपल्या जिओफोन या मॉडेलची नोंदणी सुरू केल्यावर या मॉडेलचे सर्व फिचर्स जाहीर केले आहेत.

रिलायन्स जिओफोन या मॉडेलची २४ ऑगस्टच्या सायंकाळी पाच वाजेपासून विक्रीपूर्व नोंदणी सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमिवर रिलायन्स जिओच्या संकेतस्थळावर जिओफोन मॉडेलचे सर्व फिचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने यातील फक्त मोजके फिचर्स आधी जाहीर केले होते. आता मात्र याची संपूर्ण माहिती जगासमोर आली आहे. यानुसार जिओफोन २.४ इंच आकारमानाच्या आणि क्युव्हिजीए म्हणजेच ३२० बाय २४० पिक्सल्स क्षमतेच्या डिस्प्लेने सज्ज असेल. यात १.२ गेगाहर्टझ् स्प्रेडट्रम एसपीआरडी ड्युअल कोअर प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम रॅम ५१२ मेगाबाईट तर इनबिल्ट स्टोअरेज ४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यातील मुख्य कॅमेरा दोन मेगापिक्सल्सचा तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी व्हिजीए क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे.

रिलायन्स जिओफोन या मॉडेलमध्ये २००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर १२ तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात व्हाईस कमांडवर चालणारा जिओ असिस्टंट देण्यात आला आहे. याच्या मदतीने कुणीही अ‍ॅप उघडणे, गुगल सर्च करणे तसेच एसएमएस टाईप करणे आदी कामे करू शकतो. यात मराठीसह २२ भारतीय भाषांचा सपोर्ट देण्यात आला असून हा स्मार्टफोन टिव्हीला कनेक्ट करण्याची सुविधाही असेल. यात जिओ सिनेमा, जिओ म्युझिक आणि जिओ टिव्हीसह अन्य अ‍ॅप्स प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन कायओएस या प्रणालीवर चालणारा असेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, एनएफसी, युएसबी २.० आदी सुविधा असतील. तर यात इनबिल्ट टॉर्चदेखील देण्यात आली आहे. मात्र यात फक्त सिंगल सीमकार्डचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. यामुळे यात फक्त जिओचे सीमकार्डच वापरता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here