फोर्ड या विख्यात ऑटोमोबाईल कंपनीने ‘झूमकार’ या भारतीय स्टार्टपमध्ये २.४ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
झूमकार ही कार रेंटल सेवा असून याचे बिझनेस मॉड्युल हे ‘झॅपकार’ या कंपनीच्या प्रणालीवर आधारित आहे. आजवर देशातील सात महानगरांमध्ये ही स्टार्टप कार्यरत असून या कंपनीचे अॅप १५ लाख युजर्सनी डाऊनलोड केलेले आहे. त्यांची बहुतांश वाहने ही फोर्डची असून याच कंपनीने आधीदेखील गुंतवणूक केली आहे. यातच आता २.४ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. या भांडवलाचा उपयोग करून झूमकार आपल्या व्यवसायाचा भारतातील अन्य शहरांमध्ये विस्तार करणार आहे.