झेब्रॉनिक्सचा देवनागरी कि-बोर्ड

0

झेब्रॉनिक्स कंपनीने खास करून भारतीय भाषांसाठी विकसित केलेला झेडइबी-केएम२०००एच हा देवनागरी कि-बोर्ड बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

माहिती तंत्रज्ञानात भारतीय भाषांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असून देवनागरी स्क्रीप्टचा उपयोगही वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमिवर झेब्रॉनिक्स या आयटी उपकरणांच्या निर्मितीतल्या आघाडीच्या कंपनीने
झेडइबी-केएम२०००एच हा देवनागरी कि-बोर्ड ग्राहकांना सादर केला आहे. यात देवनागरी लिपीतल्या वर्णाक्षरांचा ११३ किज असून यासोबत मल्टीमीडियाच्या नियंत्रणासाठी आठ कि प्रदान करण्यात आल्या आहेत. या आठ तसेच अन्य महत्वाच्या चार कि या लाल रंगाने दर्शविण्यात आल्या आहेत. यामुळे याचा सुलभपणे वापर करता येणार आहे. यात युएसबी कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. अर्थात हा कि-बोर्ड सुलभपणे जोडणे शक्य आहे. या कि-बोर्डला एक वर्षाची वॉरंटी प्रदान करण्यात आली असून हे मॉडेल देशभरातील आघाडीच्या रिटेल स्टोअर्समधून उपलब्ध करण्यात आले आहे.

झेडइबी-केएम२०००एच या कि-बोर्डच्या लाँचिंगप्रसंगी झेब्रॉनिक्स कंपनीचे संचालक प्रदीप दोशी म्हणाले की, भारतीय भाषांचा वापर वाढत असल्यामुळे इंग्रजीऐवजी देवनागरी कि-बोर्ड हा उपयुक्त ठरणार आहे. या पार्श्‍वभूमिवर झेडइबी-केएम२०००एच या मॉडेलमध्ये विविध उपयुक्त फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. झेडइबी-के११एच हे अन्य मॉडेलदेखील देवनागरी स्क्रीप्टमध्ये उपलब्ध असल्याची माहिती दोशी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here