झेब्रॉनिक्सचा नेपच्यून वायरलेस हेडफोन

0

झेब्रॉनिक्स कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी नेपच्यून हा वायरलेस हेडफोन सादर करण्याची घोषणा केली आहे.

झेब्रॉनिक्सचा नेपच्यून वायरलेस हेडफोन हे मॉडेल ग्राहकांना ६,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. यात हाय-एंड या प्रकारातील चीपसेट प्रदान करण्यात आली आहे. याच्या मदतीने अतिशय सुश्राव्य ध्वनीची अनुभूती घेता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. नावातच नमूद असल्यानुसार हा हेडफोन स्मार्टफोनसह अन्य उपकरणांना ब्ल्यु-टुथच्या मदतीने कनेक्ट करता येतो. याच्या ब्ल्यु-टुथची रेंज ही अतिशय उत्तम असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर ऑक्झ-इन पोर्टच्या माध्यमातून याचा वायरसह उपयोगदेखील करता येतो. याच्या इयरकपवर अतिशय मऊ आणि दर्जेदार असे आवरण लावण्यात आले आहे. यामुळे युजरला बाहेरील आवाजाचा त्रास होणार नाही. तसेच युजरने दीर्घ काळापर्यंत याचा वापर केला तरी त्याच्या कानाला त्रास होणार नाही. तर यातील बॅटरी ही एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १० तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या हेडफोनच्या इयरकपवर अतिशय आकर्षक असे एलईडी लाईट लावण्यात आले आहेत. हे लाईट संगीताच्या तालावर चालू-बंद होत असल्याने ते युजरच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. झेब्रॉनिक्सचा नेपच्यून वायरलेस हेडफोन ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये खरेदी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here