झोलोची पॉवर बँक बाजारात

0
xolo_power_bank_review

झोलो कंपनीने झोलो एक्स०६० या नावाने ६,००० मिलीअँपिअर क्षमतेची पॉवर बँक ९९९ रूपयांमध्ये सादर केली आहे.

विविध उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे पॉवर बँक आता आपल्या गरजेची वस्तू म्हणून गणल्या जात आहेत. अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी याचे उत्पादन सुरू केले आहे. यात आता झोलो कंपनीचा समावेश झाला आहे. या कंपनीने झोलो एक्स०६० या नावाने पॉवर बँक लाँच केली आहे. राखाडी आणि काळ्या रंगांमध्ये ही पॉवर बँक सादर करण्यात आली असून ती अमेझॉन इंडियावरून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. यात मायक्रो युएसबी २.०, मायक्रो युएसबी ए पोर्ट, पॉवर ऑन/ऑफ बटन आदी देण्यात आले आहेत. हे मॉडेल शॉर्ट सर्कीट, ओव्हर डिस्चार्ज, ओव्हर लिकेज, ओव्हर टेंपरेचर आदींमध्येही खराब होत नसल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनीने यासाठी एक वर्षाची वॉरंटी प्रदान केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here