टिव्हीएसची स्मार्ट स्कूटर दाखल

0

टिव्हीएस कंपनीने एनटॉर्क १२५ ही स्मार्ट स्कूटर भारतीय ग्राहकांसाठी सादर केली असून याचे एक्स-शोरूम मूल्य ५८,७५० रूपये आहे.

टिव्हीएस कंपनीने २०१६च्या ऑटो-एक्सपोमध्ये एनटॉर्क या स्मार्ट स्कूटरच्या कनसेप्टला पहिल्यांदा प्रदर्शीत केले होते. आता यावरच आधारित एनर्टार्क १२५ हे मॉडेल ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. साधारणत: १८ ते २५ वर्षे वयोगटासाठी ही स्मार्ट स्कूटर विकसित करण्यात आली आहे. याचा लूक अतिशय आकर्षक असून याला उत्तमोत्तम फिचर्सची जोड देण्यात आली आहे. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे यासोबत देण्यात आलेली स्मार्टएक्सऑननेक्ट ही प्रणाली होय. यात ब्ल्युटुथ कनेक्टीव्हिटीचा उपयोग करण्यात आला असून एका अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून याला अँड्रॉइड स्मार्टफोनशी कनेक्ट करता येते. अर्थात एखाद्या कारमधील इन्फोटेनमेंट सिस्टीमप्रमाणे ही प्रणाली काम करू शकते. अशा प्रकारची ही देशातील पहिलीच स्कूटर आहे हे विशेष. यात कनेक्ट असणार्‍या स्मार्टफोनच्या बॅटरीच्या स्टेटसह अन्य माहितीदेखील मिळू शकते.

टिव्हीएस एनर्टार्क १२५ या मॉडेलमध्ये १२४.७९ सीसी क्षमतेचे सीव्हीटीआय-आरईव्हीव्ही हे सिंगल सिलेंडर, ४ स्ट्रोक, ३ व्हॉल्व्ह, एयरकुल्ड एसओएचसी इंजिन प्रदान करण्यात आले आहे. याला अ‍ॅटोमॅटीक ट्रान्समीशनची जोड देण्यात आली असून या मॉडेलचा अधिकतम वेग ९५ किलोमीटर प्रति-तास असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात तब्बल ५५ फिचर्सचा समावेश असणारे डिजीटल क्लस्टर देण्यात आले आहे. यात नेव्हिगेशन असिस्ट, टॉप स्पीड रेकॉर्डर, इनबिल्ट लॅप टायमर, सर्व्हीस रिमाइंडर, ट्रिप मीटर, इंजिन ऑइल टेंपरेचर आणि मल्टी राईड स्टॅटिस्टीक मोड आदींचा समावेश असेल. उर्वरित फिचर्समध्ये एलईडी हेडलँप आणि टेललँप, डायमंड कट अलॉय व्हिल्स आदींचा समावेश आहे. यात ड्युअल-टोन या प्रकारातील रंगसंगती प्रदान करण्यात आली असून चार आकर्षक रंगांमध्ये ही स्मार्ट स्कूटर ग्राहकांना खरेदी करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here