टिव्हीएस अपाचे आरआर ३१० दाखल

0

टिव्हीएस कंपनीने आपली आरआर ३१० ही दुचाकी भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

अपाचे आरआर ३१० या दुचाकीचे दिल्लीतील एक्स-शोरूम मूल्य २.०५ लाख रूपये असेल. या बाईकचे बाह्यांग अतिशय आकर्षक असेच आहे. तसेच यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रोजेक्टर आणि एलईडी या प्रकारांमधील दोन हेडलँप प्रदान करण्यात आले आहेत. याच्या मदतीने अतिशय स्पष्ट असा प्रकाश तर मिळतोच पण त्यांना ३० वॅटपेक्षा कमी उर्जा लागत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यातील टेललँप आणि टर्न इंडिकेटर हेदेखील एलईडी या प्रकारातील असतील. यामध्ये डिजीटल क्लस्टर इन्स्ट्रुमेंट मीटर देण्यात आले असून यात वेग आणि इंधनाच्या प्रमाणासोबत इंजिनचे तापमान तसेच गिअरची पोझिशनदेखील दर्शविण्यात येणार आहे.

टिव्हीएस अपाचे आरआर ३१० या दुचाकीत ३१२ सीसी क्षमतेचे लिक्वीड कुल्ड इंजिन देण्यात आले असून याची संरचना बीएमडब्ल्यू जी३१०आर या मॉडेलच्या इंजिनावर आधारित आहे. टिव्हीएस कंपनीची ही दुचाकी केटीएम आरसी३९०, कावासाकी निंजा ३००, बेनेली ३०२ आर या मॉडेल्सला तगडे आव्हान देण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here