टिव्हीएस अपाचे आरटीआर १६०ची नवीन आवृत्ती

0

टिव्हीएस कंपनीने आपल्या टिव्हीएस अपाचे आरटीआर १६० या दुचाकीला व्हाईट रेस एडिशनच्या माध्यमातून बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

टिव्हीएस अपाचे आरटीआर १६०ची व्हाईट रेड एडिशन ही दोन व्हेरियंटच्या माध्यमातून बाजारपेठेत उतारण्यात आली आहे. यातील फ्रंट डिस्क तर रिअर ड्रम ब्रेकच्या व्हेरियंटचे एक्स-शोरूम मूल्य ७९,७१५ रूपये तर फ्रंट व रिअर डिस्क ब्रेकचे व्हेरियंट ८२,०४४ रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे. यात नवीन रंगसंगती देण्यात आलेली असून याच्या अंतर्गत पांढर्‍या रंगावर लाल ग्राफीक्स प्रदान करण्यात आले आहेत.

टिव्हीएस अपाचे आरटीआर १६०च्या व्हाईस रेड एडिशनमध्ये मूळ मॉडेलप्रमाणेच १५९.७ सीसी क्षमतेचे १-सिलेंडर, एयर कुल्ड इंजिन प्रदान करण्यात आले असून याला ५-स्पीड गिअर्सशी संलग्न करण्यात आले आहे. तर यात १६ लीटर पेट्रोलची टाकी दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here