टिव्हीएस अपाचे आरटीआर १६० व आरटीआर १८० आता लाल रंगाच्या पर्यायात उपलब्ध

0

टिव्हीएस कंपनीने आपले अपाचे आरटीआर १६० आणि आरटीआर १८० हे दोन मॉडेल्स आता लाल रंगाच्या पर्यायात ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे.

टिव्हीएस अपाचे ही स्पोर्टस् बाईक मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्‍वभुमिवर कंपनीने या दुचाकीची मॅट ब्ल्यू एडिशन बाजारपेठेत सादर केली आहे. यात अपाचे या बाईकचे सर्व फिचर्स कायम ठेवण्यात आले असून बाह्य सजावट मात्र अत्यंत आकर्षक करण्यात आली आहे. लाल रंगाचे हे नवीन मॉडेल अपाचे आरटीआर १८० आणि अपाचे आरटीआर १६० या दोन्ही बाईक्ससाठी सादर करण्यात आले आहे. यामुळे आता टिव्हीएस आरटीआर १८० हे मॉडेल एकंदरीत सात तर आरटीआर १६० हे मॉडेल सहा रंगांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

अपाचे आरटीआर १८० या मॉडेलमध्ये १७७.४ सीसी क्षमतेचे सिंगल सिलींडर फोर-स्ट्रोक इंजिन आहे. तर अपाचे आरटीआर १६०मध्ये १५९.७ सीसी क्षमतेचे सिंगल सिलींडर फोर-स्ट्रोक इंजिन दिलेले आहे. दोन्हींना ५ स्पीड गिअर्स संलग्न केलेले आहेत. यातील अपाचे आरटीआर १८०चे मुल्य (एक्स-शोरूम) ८१,८३३ तर अपाचे आरटीआर १६०चे मुल्य (एक्स-शोरूम) ७७,८६५ रूपये इतके आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here