टिव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही आता नवीन स्वरूपात

0

टिव्हीएस कंपनीने आपल्या अपाचे आरटीआर २०० ४व्ही या दुचाकीच्या रेस एडिशन २.० या आवृत्तीला आता चार नवीन रंगाच्या पर्यायांमध्ये बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

गेल्या वर्षी टिव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही या मॉडेलची रेस एडिशन २.० ही आवृत्ती सादर करण्यात आली होती. ही दुचाकी ब्लॅक शेड आणि रेड ग्राफीक्स या पर्यायात उपलब्ध करण्यात आले होते. आता मात्र यात चार नवीन रंगांची भर पडणार आहे. याच्या अंतर्गत ग्रे आणि यलो, रेड आणि ब्लॅक, व्हाईट आणि रेड तसेच ब्लॅक आणि रेड अशा चार ड्युअल रंगसंगतीची भर पडली आहे. याचे अन्य फिचर्स व मूल्य हे मूळ मॉडेलप्रमाणेच असेल. अर्थात ही नवीन आवृत्ती कार्ब्युरेटर, इएफआय आणि एबीएस या तीन व्हेरियंटमध्ये मिळणार असून याचे एक्स-शोरूम मूल्य ९५,१८५ रूपयांपासून सुरू होणारे आहे. यात अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे अँटी-रिव्हर्स टॉर्क (ए-आरटी) स्लीपर क्लच होय. यामुळे गिअर बदलण्याची प्रक्रिया अगदी सुलभपणे पार पडत असून याचा अर्थातच दुचाकीस्वाराच्या संतुलनावर अनुकुल परिणाम होत असल्याचे टिव्हीएस कंपनीने नमूद केले आहे. टिव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही या दुचाकीत २०० सीसी क्षमतेचे सिंगल सिलींडर, एयरकुल्ड इंजिन देण्यात आले असून याला ५ स्पीड गिअरबॉक्स संलग्न करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here