टिव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही आता नवीन स्वरूपात

0

टिव्हीएस कंपनीने आपल्या अपाचे आरटीआर २०० ४व्ही या दुचाकीची रेस एडिशन २.० ही नवीन आवृत्ती बाजारपेठेत सादर केली आहे.

टिव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही या दुचाकीला आधीच बाजारपेठेत उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्‍वभूमिवर, याची रेस एडिशन २.० ही नवीन आवृत्ती कार्ब्युरेटर, इएफआय आणि एबीएस या तीन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. याचे एक्स-शोरूम मूल्य ९५,१८५ रूपयांपासून सुरू होणारे आहे. यात अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे अँटी-रिव्हर्स टॉर्क (ए-आरटी) स्लीपर क्लच होय. यामुळे गिअर बदलण्याची प्रक्रिया अगदी सुलभपणे पार पडत असून याचा अर्थातच दुचाकीस्वाराच्या संतुलनावर अनुकुल परिणाम होत असल्याचे टिव्हीएस कंपनीने नमूद केले आहे.

टिव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही या दुचाकीच्या नवीन आवृत्तीचा लूक हा थोड्या प्रमाणात बदलण्यात आला आहे. मात्र यातील अन्य फिचर्स हे मूळ आवृत्तीनुसारच असतील. अर्थात यात २०० सीसी क्षमतेचे सिंगल सिलींडर, एयरकुल्ड इंजिन देण्यात आले असून याला ५ स्पीड गिअरबॉक्स संलग्न करण्यात आला आहे. टिव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही या मॉडेलची रेस एडिशन २.० ही नवीन आवृत्ती बाजारपेठेत उपलब्ध असणार्‍या बजाज पल्सर एनएस २०० व यामाहा एफझेड २५ या मॉडेल्सला तगडे आव्हान देऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here