टिव्हीएस एनटॉर्कचे रेस व्हेरियंट

0

टिव्हीएस कंपनीने अलीकडेच सादर केलेल्या एनटॉर्क या स्कूटरचे रेस व्हेरियंट बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

टिव्हीएसच्या एनटॉर्क या मॉडेलला बाजारपेठेत उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्‍वभूमिवर, याची रेस या नावाने नवीन आवृत्ती ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे. नावातच नमूद असल्यानुसार यामध्ये वेगाला महत्व देण्यात आलेले आहे. यात मूळ आवृत्तीनुसारच १२५ सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. तथापि, मूळ आवृत्तीपेक्षा यात जास्त शक्ती निर्माण होत असून अर्थात याचा वेगदेखील जास्त आहे. यात कमाल १२० किलोमीटर प्रति-लिटर इतका वेग गाठता येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये दर्जेदार टायर्स आणि अद्ययावत शॉकअप्सदेखील देण्यात आले आहेत. यामुळे अर्थातच जास्त गती असतांनाही या स्कूटरवर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे. याशिवाय यामध्ये अन्य किरकोळ बदल करण्यात आले आहेत. या मॉडेलला लवकरच अधिकृतपणे बाजारपेठेत उतरवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here