टिव्हीएस एनटॉर्क १२५ स्कूटर आता नवीन रंगात

0

टिव्हीएस कंपनीने अलीकडेच सादर केलेल्या एनटॉर्क १२५ या स्मार्ट स्कूटरला आता दोन नवीन आकर्षक रंगांच्या पर्यायात सादर करण्याची घोषणा केली आहे.

टिव्हीएस एनटॉर्क १२५ ही स्कूटर या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आली होती. यात ड्युअल टोन रंगसंगती प्रदान करण्यात आली असून पहिल्यांदा हे मॉडेल मेट यलो, मेट व्हाईट, मेट ग्रीन आणि मेट रेड या चार रंगांमध्ये सादर करण्यात आले होते. यात आता मेटॅलिक ब्ल्यू आणि मेटॅलिक ग्रे या दोन आकर्षक रंगांची भर पडणार आहे. अर्थात आता टिव्हीएस कंपनीची ही स्कूटर ग्राहकांना एकंदरीत सहा रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. यातील अन्य फिचर्स हे मूळ मॉडेलनुसारच असतील.

टिव्हीएस एनर्टार्क १२५ या मॉडेलमध्ये १२४.७९ सीसी क्षमतेचे सीव्हीटीआय-आरईव्हीव्ही हे सिंगल सिलेंडर, ४ स्ट्रोक, ३ व्हॉल्व्ह, एयरकुल्ड एसओएचसी इंजिन प्रदान करण्यात आले आहे. याला अ‍ॅटोमॅटीक ट्रान्समीशनची जोड देण्यात आली असून या मॉडेलचा अधिकतम वेग ९५ किलोमीटर प्रति-तास असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात तब्बल ५५ फिचर्सचा समावेश असणारे डिजीटल क्लस्टर देण्यात आले आहे. यात नेव्हिगेशन असिस्ट, टॉप स्पीड रेकॉर्डर, इनबिल्ट लॅप टायमर, सर्व्हीस रिमाइंडर, ट्रिप मीटर, इंजिन ऑइल टेंपरेचर आणि मल्टी राईड स्टॅटिस्टीक मोड आदींचा समावेश असेल. उर्वरित फिचर्समध्ये एलईडी हेडलँप आणि टेललँप, डायमंड कट अलॉय व्हिल्स आदींचा समावेश आहे. यामध्ये स्मार्टएक्सऑननेक्ट ही प्रणाली देण्यात आली आहे. यात ब्ल्युटुथ कनेक्टीव्हिटीचा उपयोग करण्यात आला असून एका अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून याला अँड्रॉइड स्मार्टफोनशी कनेक्ट करता येते. अर्थात एखाद्या कारमधील इन्फोटेनमेंट सिस्टीमप्रमाणे ही प्रणाली काम करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here