टिव्हीएस स्टार सिटी प्लस गोल्ड एडिशन दाखल

0

टिव्हीएस कंपनीने आपल्या स्टार सिटी प्लस या दुचाकीच्या प्रथम वर्धापनदिनाचे औचित्य साधून याची इलेक्ट्रीक स्टार्टची सुविधा असणारी गोल्ड एडिशन सादर केली आहे.

टिव्हीएस कंपनीच्या आधीच्या मॉडेलपेक्षा ही दुचाकी पाच हजार रूपयांनी महाग आहे. अर्थात यात वर नमुद केल्याप्रमाणे इलेक्ट्रीक स्टार्टची सुविधा तर आहेच पण याच्यासोबत याचा लुकही अधिक आकर्षक करण्यात आला आहे. यात सोनेरी आणि पांढर्‍या रंगाची आकर्षक संगती दिलेली आहे. टिव्हीएस कंपनीच्या या बाईकमध्ये ट्युबलेस टायर्स दिलेले आहेत. यात सीटच्या खाली युएसबी चार्जींगची सुविधा दिलेली आहे.

अर्थात आधीप्रमाणेच याचे १०९.७ सीसी क्षमतेचे इंजिन आहे. टिव्हीएस स्टार सिटी प्लस गोल्ड एडिशन ही दुचाकी प्रति लिटर ८५ किलोमीटर इतके मायलेज देत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. दिल्लीतील याचे एक्स-शोरूम मुल्य ४८९३४ रूपये इतके आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here