टिव्हीएस ‘स्पोर्टस्’ची सिल्व्हर अलॉय एडिशन

0

टिव्हीएस कंपनीने आपल्या स्पोर्टस् या लोकप्रिय दुचाकीची सिल्व्हर अलॉय एडिशन या नावाने नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याचे जाहीर केले आहे.

टिव्हीएस स्पोर्टस् ही या कंपनीची सर्वात किफायतशीर मूल्य असणारी बाईक आहे. याला आजवर अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या मॉडेलचे २० लाख युनिट विकले गेल्याचे औचित्य साधून याची सिल्व्हर अलॉय एडिशन सादर करण्यात आली असून याचे एक्स-शोरूम मूल्य ३८,९६१ रूपये आहे. व्होल्कॅनो रेड आणि ब्लॅक सिल्व्हर या दोन आकर्षक रंगाच्या पर्यायांमध्ये हे मॉडेल ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये ९९.७ सीसी क्षमतेचे एयर-कुल्ड या प्रकारातील इंजिन देण्यात आले असून ही बाईक तब्बल ९५ किलोमीटर प्रति-लिटर इतके मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यामध्ये पुढील आणि मागील या दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक प्रदान करण्यात आले आहेत. याच्या पुढील बाजूस टेलीस्कोपीक फॉर्क तर मागील बाजूस ट्विन स्प्रींग शॉक अ‍ॅब्सॉर्बर देण्यात आले आहेत. यामध्ये इको आणि पॉवर मोड देण्यात आले असून या दोन्हींमधील मायलेज चेक करण्याची सुविधा इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here