ट्रुव्हिजनचा एचडी स्मार्ट टिव्ही

0

ट्रुव्हिजन कंपनीने भारतीय बाजारपेठेत ४० इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचे टिएक्स४०७झेड हा स्मार्ट टिव्ही सादर करण्याची घोषणा केली आहे.

ट्रुव्हिजन कंपनीने अलीकडच्या कालखंडात भारतात नियमित कालखंडानंतर विविध स्मार्ट टिव्ही सादर करण्याचा सपाटा लावला आहे. या अनुषंगाने या कंपनीने ट्रुव्हिजन टिएक्स४०७झेड हा नवीन टिव्ही सादर केला आहे. वर नमूद केल्यानुसार यात हाय डेफिनेशन (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात कोरेना हे तंत्रज्ञान इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे. यामुळे टिव्ही पाहतांना डोळ्यांवर तुलनेत कमी प्रमाणात ताण पडत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. याला गेमिंग कन्सोल जोडण्याची अथवा संगणकाचा मॉनिटर म्हणून वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात दोन एचडीएमआय आणि दोन युएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. मिराकास्ट प्रणालीच्या मदतीने युजर आपला स्मार्टफोन याला अटॅच करू शकतो. हा स्मार्ट टिव्ही अँड्रॉइड प्रणालीवर चालणारा असून गुगल प्ले स्टोअरवरून अ‍ॅप इन्स्टॉल करून याचा वापर यावर करता येणार आहे. या टिव्हीवर नेटफ्लिक्स, युट्युब आणि हॉटस्टारसारख्या अ‍ॅपवरील कंटेंट पाहता येणार आहे. टिएक्स४०७झेड हा स्मार्ट टिव्ही ३४,९९० रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here