ट्रुव्हिजनचा ३२ इंची फुल एचडी स्मार्ट टिव्ही

0

ट्रुव्हिजन कंपनीने भारतीय ग्राहकांना टिएक्स३२७१ हा ३२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा स्मार्ट टिव्ही लाँच करण्याची घोषणा केली आहे.

ट्रुव्हिजन टिएक्स३२७१ हा स्मार्ट टिव्ही ग्राहकांना २३४९० रूपये मूल्यात उपलब्ध केला असून देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे. यात ३२ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० अर्थात फुल एचडी क्षमतेचा आणि ३,०००००:१ कॉन्ट्रास्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात अतिशय दर्जेदार सराऊंड साऊंड सिस्टीम असेल. तर यात वाय-फाय कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. तसेच यात दोन एचडीएमआय आणि दोन युएसबी पोर्टदेखील असतील.

ट्रुव्हिजन टिएक्स३२७१ हा स्मार्ट टिव्ही अँड्रॉइडच्या किटकॅट ४.४ या आवृत्तीवर चालणारा असेल. यात अनेक अ‍ॅप्स प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहेत. मिराकास्ट या प्रणालीच्या मदतीने हा स्मार्ट टिव्ही स्मार्टफोन अथवा टॅब्लेटला जोडता येईल. याच्यासोबत एयरफ्लाय माऊस या प्रकारातील रिमोट कंट्रोल प्रदान करण्यात आला असून याच्या मदतीने या मॉडेलच्या विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here