ट्विटरवर जीआयएफ बटन

0

ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटने आपल्या युजर्सला जीआयएफ प्रतिमा शेअर करण्यासाठी खास बटन देऊ केले असून याची चाचणी करण्यात येत आहे.

जीआयएफ ऍनिमेशन प्रतिमा या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. सध्या ट्विटरवर जीआयएफ प्रकारातील प्रतिमा अपलोड करून शेअर करता येतात. एवढेच नव्हे तर या प्रकारच्या इमेजेस ‘ऑटो-प्ले’ करण्याची सुविधादेखील यावर प्रदान करण्यात आली आहे. आता मात्र कोणताही युजर त्यांना थेट अपलोड करू शकणार आहे. ट्विटरच्या अँड्रॉईड ऍपवर यासाठी बटन देण्यात आले आहे. कॅमेरा आणि पोल या आयकॉन्समध्ये याचे स्थान असणार आहे. यावर क्लिक केल्यास कुणालाही ट्विटरवर सध्या ट्रेंडिंगमध्ये असणार्‍या जीआयएफ इमेज अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. काही युजर्सनी या सुविधेचा स्क्रीनशॉटही दिला आहे. मात्र अद्याप ट्विटरने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here