डिजेआयचा ड्रोनसाठी व्हिआर हेडसेट

0

डिजेआयने ड्रोनच्या रियल टाईम व्हिडीओची चित्तथरारक अनुभुती घेण्यासाठी एफपीव्ही गॉगल्स या नावाने व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेट लाँच केला आहे.

सध्या बहुतांश ड्रोन्सच्या कॅमेर्‍यातून करण्यात येणारे व्हिडीओ चित्रीकरण हे स्मार्टफोन अ‍ॅप अथवा त्या मॉडेलच्या रिमोट कंट्रोलवरील डिस्प्लेवर दिसत असते. नेमके हेच चित्रीकरण आभासी सत्यता म्हणजेच व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीत अनुभवण्याची सुविधा एफपीव्ही गॉगल्सच्या माध्यमातून मिळणार आहे. याच्या आतील भागात १२८० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचे दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत. याच्या मदतीने हेडसेट लावलेला व्यक्ती हा जणू काही त्या ड्रोनमध्येच बसल्याची अनुभुती त्याला येते. अर्थात त्याला ३६० अंशात ड्रोनचा कॅमेरा करत असलेले चित्रीकरण अनुभवता येते. हा हेडसेट माव्हिक प्रो आणि फँटम ४ तसेच डिजेआय कंपनीच्या अन्य मॉडेल्सला कनेक्ट करता येतो. यातील सर्वात उत्कंठावर्धक बाब म्हणजे डोक्याच्या हालचालीने ड्रोनचे दिशा-निर्देशन करता येते. अर्थात ड्रोनला पुढे-मागे अथवा वर-खाली करावयाचे असल्यास रिमोट कंट्रोलवरील जॉयस्टिक ऐवजी अशीच डोक्याची हालचाल पुरेशी असते. या उपकरणाचे मूल्य ४४९ डॉलर्स असून ते ग्राहकांना २० मे पासून खरेदी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here